TikTok व्हिडीओ पडला महागात, पुण्यातील बस चालकाची गेली नोकरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन : ‘टिकटॉक’ या चिनी अ‍ॅपची सध्या प्रचंड क्रेझ आहे. तरुणांसोबतच, इतर वयोगटातील लोकही याकडे आकर्षिले जात आहेत. मोठ्या प्रमाणात युजर्स टिकटॉकवर व्हिडीओ तयार करत असतात. ज्यामुळे अनेक जण अल्पावधीत लोकप्रिय झाले आहेत. मात्र एका पीएमपी बस चालकाला या टिकटॉकवर व्हिडीओ बनवणं महागात पडलं असून त्याला आपली नोकरी गमवावी लागली आहे.

https://www.tiktok.com/@maheshgovardankar/video/6783168244611091713

मिळालेल्या माहितीनुसार पीएमपीएमएलच्या बस चालकाने कामावर असताना टिकटॉकवर व्हिडीओ बनविला. बस डेपोमध्ये त्याने केलेला हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने याची दखल घेत या बस चालकाला निलंबित करण्यात आले. त्यानंतर त्याला बडतर्फही केलं आहे.

https://www.tiktok.com/@maheshgovardankar/video/6783167119107427586

दरम्यान, टिकटॉकवरील या प्रकरणाची प्रशासनाने दखल घेतली असून यामुळे महामंडळाची प्रतिमा लोकांमध्ये मलिन होत आहे. या प्रकरणी सर्व चालक-वाहक आणि खासगी बसेस वरील सेवकांना बसमधील व्हिडीओ आणि फोटो व्हायरल न करण्याची नोटीस बजावली आहे. त्यांनतर प्रवाशांना देखील बसमध्ये व्हिडीओ करण्यास मनाई करण्याची सूचना करण्यात आली आहे, यासंबंधित एक परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यानुसार कोणी चालक आणि सेवक यांचे काही व्हिडीओ, फोटो व्हायरल झाल्याचे निदर्शनास आल्यास चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचं नमूद केलं आहे.

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like