बाणेर परिसरातून पिस्तूलासह एक अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – चतु:श्रृंगी पोलिसांच्या लोकसभा निवडणूक पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गस्तीदरम्यान बाणेर परिसरातून पिस्तूलासह एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून २५ हजार रुपये किंमतीचे पिस्तूल आणि १ जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे.
ओमकार प्रदीप सुतार (वय 23 वर्षे, रा. मनपा शाळेशेजारी दत्त मंदिराजवळ बाणेरगाव, पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोकसभा पथकातील अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस नाईक विशाल साबळे यांना त्यांचे बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, ओमकार प्रदीप सुतार याच्याकडे पिस्तूल आहे. त्यानासर त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. तेव्हा त्याच्याजवळ एक लोखंडी गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतुस मिळून आले. त्यानंतर त्याच्यावर आर्म एक्ट कलम 3(25)व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37(1)135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू, सहाय्यक पोलीस आयुक्त देवीदास पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) वैशाली गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदेश केंजळे, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम फड कर्मचारी प्रदिप खळदकर, बाळू गायकवाड, मुकुंद तारू, एकनाथ जोशी, विशाल साबळे सारस साळवी, प्रकाश आव्हाड, दादा काळे, संतोष जाधव, अजय गायकवाड, ज्ञानेश्वर मुळे, अमर शेख, तेजस चोपडे यांच्या पथकाने केली.