लसीकरणानंतर ४ महिन्याच्या बालिकेचा मृत्यू ; सात बालकं रुग्णालयात

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – जळगाव येथील यावल तालुक्यातील डोंगरदे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत चुकीच्या लसीकरणामुळे निकिता प्रेमराज पावरा या चार महिन्याचा बालिकेचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांकडून करण्यात आला आहे. याबरोबरच निकिता शिवाय इतर आठ मुलांना देखील ही लस देण्यात आली होती. ही आठ मुलं देखील आजारी पडली असून सर्वांना यावल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान तीन दिवसांपूर्वी पिंटू जिनु पावरा या सात वर्षीय बालकाचा देखील मृत्यू झाला आहे. या दोन्ही मुलांना रोगांना प्रतिबंध करणारी एक लस दिल्यामुळे या दोघांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
याबाबत मिळलेली अधिक माहिती अशी की, डोंगरदे येथील जिल्हा परिषद शाळेत १६ तारखेला लसीकरणाचा कार्यक्रम पार पडला. त्यात काही बालकांना लसीकरण देण्यात आले. त्यातल्या एका मुलीला लसीकरणानंतर त्रास झाल्यामुळे त्यांना यावल ग्रामीण दाखल करण्यात आले. परंतु तिथेच उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्याव्यतिरिक्त सात मुलांनाही या लसीकरणानंतर त्रास झाल्याचे वृत्त आहे.
लसीकरणानंतर बुधवारी (ता.२०) रात्री पासून ताप,उलटया,जुलाबची लागण झाल्याने ९ बालकांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान निकिता नामक बालिकेचा मृत्यू झाला तर दुसऱ्या बालकाला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
डोंगरदे गावात २० मार्चच्या सायंकाळ पासुन पाडयावर राहणारे रोशनी बिलाल सिंग चव्हाण (वय ८ महीने), पवन विनोद पावरा (वय३ महीने), आनंद रिसला पावरा (वय ३ वर्ष) कृष्णा गुमानबारेला (वय अडीच वर्ष), भरत सुनिल पावरा (वय ३ वर्ष), शरद सुनिल पावरा (वय ३ महीने), दिक्षा नितिन पावरा (दीड वर्ष), यांना लस दिल्यापासून त्रास होत होता.
या घटनेचे वृत कळताच यावल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.हेमंत बऱ्हाटे, यांच्या पथकाने तात्काळ दक्षता घेऊन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. सर्व मुलींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैधकीय अधिकारी डॉ. शुभम जगताप यांनी सांगीतले.
पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like