गॅस सिलेंडर चोरणाऱ्यास अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कोंढवा परिसरातून गॅस सिलेंडर चोरणाऱ्या चोरट्यास कोंढवा पोलिसांनी अटक करुन त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत.

कलेश वनाप्पा शिंगे (वय २३, रा़ लक्ष्मीनगर, पर्वती) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीची रिक्षा, गॅस सिलेंडर व गॅस कटर जप्त केला आहे. कलेश शिंगे याने कोंढवा येथील दोन आणि बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक असे तीन गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

ही कामगिरी कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस निरीक्षक महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक चेतन मोरे, उपनिरीक्षक संतोष शिंदे, अंकुश करचे, पोलीस नाईक हेमंत राऊत, पोलीस शिपाई किरण रघतवान, हवालदार राजस शेख, इकबाल शेख, विलास तोगे, पोलीस नाईक अमित साळुंके, सुरेंद्र कोलगे, संजय कळंबे, पृथ्वी राज पांडुळे, सुशील धिवर, जयंत चव्हाण, किरण मोरे, निलेश वणवे, पोलीस शिपाई जगदीश पाटील, अजीम शेख, उमाकांत स्वामी या पथकाने केली आहे.

You might also like