केरळ पूरग्रस्तांना पिंपरी चिंचवड शहरातून एक कोटीची मदत

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

केरळमध्ये अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या संकटप्रसंगी पूरग्रस्तांना मदत म्हणून पिंपरी चिंचवडमधून १ कोटी ६ लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड मधून भाजप, राष्ट्रवादी, सेना, मनसे या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून एक दिवसाचा पगार अशी आर्थिक मदत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.

जाहिरात

या वेळी भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, जेष्ठ नेते आझम पानसरे, आयुक्त श्रावण हर्डीकर, मनसेचे गटनेते सचिन चिखले, अपक्ष गटनेते कैलास बारणे आदी उपस्थित होते.

पुणे : कंपनीने कामगारांचा २ कोटींचा पीएफ थकवला 

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, केरळवर आलेली नैसर्गिक आपत्ती भीषण असून, व आपले राष्ट्रीय कर्तव्य असून पिंपरी चिंचवड शहरातील भाजपसह सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि नगरसेवक यांचे एक महिन्याचे मानधन, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून एक दिवसाचा पगार अशी आर्थिक मदत केरळ पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्यात आली आहे.