बसमधून तब्बल १ कोटी रुपयांची बॅग जप्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आगामी लोकसभेची रणधुमाळी सुरु झाली आहे. आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. मात्र ऐन निवडणुकीच्या काळात आंध्र प्रदेशातील राजम येथे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन बसमधून तब्बल जवळपास १ कोटी रुपये असलेली बॅग जप्त करण्यात आली आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर अशी पैशाने भरलेली बॅग सापडल्यामुळे मात्र एकच खळबळ उडाली आहे. याबाबतचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

आंध्र प्रदेश मधील श्रीककुलम पोलिसांना ही जवळपास १ कोटी रुपये असलेली पैशांची बॅग हस्तगत केली आहे. राजममधील जेंदाला दिबा येथे ही बॅग सापडली आहे. एवढी मोठी रक्कम असलेली ही बॅग नक्की कोणाची आहे याबाबत अद्याप माहिती उपलब्ध झाली नाही. याबाबत तेथील पोलीस अधिक तपास करीत आहेत.

दरम्यान महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात देखील बसमधून ९ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास गगनबावडा वनरक्षक चौकीनजीक ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी संतोषकुमार पटेल (छिंदवाड, मध्य प्रदेश) याला ताब्यात घेण्यात आले. त्याने ही रक्‍कम गोव्यातील एका बांधकाम टेंडरसाठी आणल्याची प्राथमिक माहिती दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.