भरारी पथकानं नागपूरात एकाच दिवशी 1 कोटीची रोकड पकडली

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीसाठी पैशाचा वापर रोखण्यासाठी निवडणुक आयोगाकडून भरारी पथकांची स्थापना केली आहे. नागपूर येथील भरारी पथकाने दोन कारमधून आणलेली सुमारे १ कोटी रुपयांची रोकड पकडली आहे. ही रोकड एका राजकीय पक्षाची असल्याचे सांगितले जात असून त्यामुळे खळबळ उडाली आहे.

मोठ्या शहरात तसेच महामार्गावर नाकाबंदी करुन संशयित वाहनांची तपासणी केली जात असताना पाचपावली उड्डाणपुलावर सोमवारी दुपारी साडेतीन वाजता एक स्वीफ्ट कार वेगाने येताना दिसली. तिला थांबविले असता गाडीत चार व्यक्ती होत्या. कारची तपासणी केली असताना त्यात मोठी रोकड आढळून आली. कारमधील लोकांना त्याचे स्पष्टीकरण देता येत नव्हते. त्यामुळे त्यांना पाचपावली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. प्राप्तिकर खात्याचे अधिकारी नोटा मोजण्याचे मशीन घेऊन पोलीस ठाण्यात पोहचले. रात्री उशिरापर्यंत त्याची मोजणी सुरु होती. ही रोकड तब्बल ७५ लाख रुपये इतकी भरली.

दरम्यान, ही रोकड लॉजिकेश सोल्युशन कंपनीची असल्याचे सांगितले जाते. ही कंपनी वेगवेगळ्या ग्राहकांकडून रक्कम जमा करुन ती बँकेत जमा करण्याची जबाबदारी पार पाडते. एटीएममध्ये रक्कम जमा करण्याचेही काम करते. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आज नेहमीप्रमाणे वीज मंडळाच्या कलेक्शन सेंटरवरुन ही रोकड जमा केली आणि ती स्टेट बँकेच्या मुख्यालयात जमा करण्यासाठी निघाले असताना नाकाबंदी दरम्यान त्यांना पकडल्याचे सांगितले जात आहे.

याच दरम्यान दुसऱ्या पथकाने टेकडी गणेश मंदिराजवळील मानस चौकात सोमवारी रात्री एका ओला कारमधून आलेल्या दोघांकडून २५ लाख रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. त्यांना सीताबर्डी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. याची माहिती प्राप्तिकर अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी