home page top 1

अरे देवा ! पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात एका दिवसाच्या अर्भकाचा मृत्यू तर आई ‘गंभीर’

श्रीगोंदा, जि. नगर : पोलीसनामा ऑनलाइन – पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात एका दिवसाच्या चिमुगल्याचा जागीच मृत्यू झाला, तर आई गंभीर जखमी झाली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे भवानीमाता रोडवर आज ही दुर्दैवी घटना घडली.

पुणे येथील मूळचे रहिवाशी असलेले गुलाब पप्पू कोळी गेल्या एक दीड महिन्यापासून कुटुंबासह
पेडगाव येथे कोळसा बनविण्याचे काम करीत आहेत. कोळी यांच्या पत्नीने दोन दिवसापूर्वी एका बाळास जन्म दिला. प्रसुतीनंतर महिला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी झोपडीत होती. यावेळी अचानक एका पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक झोपडीत असलेल्या बाळावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात बालकाचा मृत्यू झाला. बाळाला वाचविताना आईने कुत्र्याचा प्रतिकार केला. यावेळी आईलाही कुत्र्याने चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली आहे.

याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात अवघ्या एका दिवसाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.

visit : Policenama.com

Loading...
You might also like