पिंपरी-चिंचवड शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये फक्त २९.३३ टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. मागील वर्षी १ मे रोजी पवना धरणामध्ये ३७.७० टक्के पाणीसाठा होता. मागील वर्षीपेक्षा यंदा पाणीसाठा कमी असल्याने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. येत्या सोमवार (दि.६) पासून पिंपरी-चिंचवड शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मागील वर्षी पावसाळ्यात परतीच्या मान्सूनचा पाऊस न झाल्याने पवना धरणामध्ये कमी पाणी आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने महापालिकेस पाणी कपात करण्यास वारंवार कळवले होते. जलसंपदा विभागाने दिलेल्या सुचनेनुसार पालिकेने शहरातील विविध भागात आठवड्यातून एक दिवस पाणी कपात केली होती.

पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणी साठी ३० टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. त्यातच उन्हाचे प्रमाण वाढल्याने बाष्पीभवनाचाही वेग वाढला आहे. तसेच पावसाची अनिश्चितता असल्याने सध्याचा पाणीसाठी ३० जून पर्य़ंत पुरेल एवढाच आहे. त्यामुळे महापालिकेने शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी पाणी टंचाई लक्षात घेऊन पाणी जपून वापरावे, तसेच घरातील किंवा इमारतीमध्ये होणारी पाणी गळती थांबवावी असे पालिकेने आवाहन केले आहे.

Loading...
You might also like