दुर्दैवी ! ‘बलून’ सिलिंडरच्या स्फोटात 12 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

इचलकरंजी : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूर नाका परिसरातील स्वामी मळा येथे बलुनमध्ये गॅस भरण्याच्या सिलिंडरचा स्फोट झाल्याने एका 12 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सना पठाण (वय-12) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. जोरदार आवाज झाल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली. गॅस स्फोटाची शहरातील ही चौथी घटना असून यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

स्वामी मळा परिसरात मुकेश राठोह हा फुगेवाला कार्बन पावडरपासून स्वत: गॅस तयार करत होता. त्याने काल रात्री गॅस टाकी भरून ठेवली होती. आज सकाळी याच टाकीचा स्फोट झाला. यामध्ये दारात खेलत असणारी सना ही मुलगी गंभीर जखमी झाली. या स्फोटामध्ये सनाचे दोन्ही पाय आणि हात निकामी झाले. गंभीर झालेल्या सनाला जखमी अवस्थेत तातडीने आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या ठिकाणी तिच्यावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु उपचारादरम्यान सनाचा मृत्यू झाला.

घटनेच्यावेळी सनाची आई रेश्मा आणि लहान भाऊ उमर पठाण हे दोघे दारात होते. आई भांडी घासत होती. पण सुदैवाने या घटनेत त्यांना काहीही इजा झाली नाही. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण आहे. स्फोटाची माहिती मिळताच पोलीस उप अधीक्षक गणेश बिरादर व पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी भेट देऊन घटनेची माहीत दिली. दरम्यान, असा व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like