डेंगूने एकाचा मृत्यू, श्रीरामपुरात खळबळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – श्रीरामपुर शहरातील मोरगे वस्ती येथील रहिवासी असलेल्या अनिल मारुती पवार (वय 34) या युवकाचा डेंगू आजारामुळे उपचारादरम्यान आज दुपारी मृत्यू झाला. नगरच्या एशियन नोबेल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. डेंगूमुळे युवकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त पसरताच श्रीरामपूर शहरात खळबळ उडाली आहे.

अनिल पवार हे गेल्या काही दिवसांपासून डेंगू आजाराने ग्रस्त होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी नगरच्या नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना आज दुपारी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव झाला आहे. मात्र आरोग्य विभागाकडून कोणत्याही प्रकारची हालचाल केली जात नाही. पवार यांच्या मृत्यूच्या घटनेपूर्वी महापालिकेतील आरोग्य विभागातील कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला होता. तेव्हाही आरोग्य विभागाकडून कुठल्या प्रकारची हालचाल झाली नसल्याने प्रादुर्भाव वाढला आहे.

Visit – policenama.com 

You might also like