बीड : तुल्यतुलाई सौर ऊर्जा प्लांटमध्ये स्फोट ; १ ठार २ जखमी

बीड :  पोलीसनामा ऑनलाइन – तुल्यतुलाई सौर ऊर्जा प्लांटमध्ये भीषण स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला. हा स्फोट बीड जिल्ह्यातील धारुर तालुक्यातील असलेल्या तुल्यतुलाई सौर ऊर्जा प्लांटमध्ये आज पहाटेच्या सुमारास झाला. यामध्ये होरपळून एका कामागाराचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर लातूरमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आज पहाटे तीन ते साडेतीनच्या दरम्यान तुल्यतुलाई सौर ऊर्जा प्लांटमध्ये स्फोट झाला. स्फोटानंतर लागलेल्या आगीमध्ये एका कामगाराचा १०० टक्के भाजून मृत्यू झाला. तर आगीच्या झळ्या बसल्याने दोन कामगार जखमी झाले. आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. जखमींना तात्काळ बाहेर काढून त्यांना उपचारासाठी लातूर येथे हलवण्यात आले.

हा स्फोट इतका तिव्र होता की स्फोटाचा आवाज आजूबाजूच्या गावांमध्ये ऐकू आला. हा स्फोट नेमका कशाचा होता हे अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी तुल्यतुलाई सौर ऊर्जा प्लांटमध्ये कोणालाही जाण्यास मनाई केली असून पोलीस अधिक चौकशी करत आहेत. दरम्यान या स्फोटामुळे परिसरात घबराहट पसरली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –