वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुणे : पोलीसानामा ऑनलाईन – भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. नवीन कात्रज बोगद्यात हि घटना दोन दिवसांपुर्वी सकाळी घडली. सुनील सोपान शिंदे (वय ४५, रा. शिंदेवाडी, भोर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी पोलीस नाईक राजाराम कोलते यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहनधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी सकाळी सव्वा नउ वाजण्याच्या सुमारास सुनील कामानिमित्त दुचाकीवरुन नवीन कात्रज बोगद्यातून चालले होते.

त्यावेठी पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरात धडक दिली. यात सुनील दुचाकीवरुन खाली पडले. त्यामुळे गंभीररित्या जखमी होउन त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी सहायक पोलीस फौजदार मोहन देशमुख अधिक तपास करीत आहे.

Visit : Policenama.com