माझ्याकडून अपघात झाला अन् त्याचा मृत्यू झाला, मला अटक करा म्हणणारा ‘चालक’ मुंढव्यात

पुुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अपघतानंतर जखमीला सोडून पसार होणारे वाहन चालक सर्वांनाच माहित असतील, पण त्याला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करणारे अन तो मयत झाल्याचेही घोषीत केल्यानंतरही डॉक्टरांना माझ्याकडून अपघात झाला असून, तुम्ही पोलिसांना बोलवून घ्या, असा म्हणारा एखादाच वाहन चालक असतो. अशीच एक घटना मुंढव्यात घडली असून, या कार चालकाने सर्व घटना सांगत गुन्हा दाखल करा आणि अटकही करा असेच पोलिसांना सांगितले आहे.

या अपघातात पादचारी संजीवन सदाशिव गणगे (वय 55, रा. कोंढवा-खुर्द) यांचा दुदैर्वी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कार चालक हसीब अजीज रंगरेज (वय 45, रा. भाग्योदयनगर, कोंढवा-खुर्द) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणगे हे भिक्षेकरी आहेत. तर, रंगरेज यांचे गॉगलचे दुकान आहे. ते दोन दिवसांपुर्वी (1 डिसेंबर) त्यांच्या आयटेन कारने रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कोंढव्यातून मुंढव्याकडे जात होते. त्यावेळी गणगे हे रस्ता ओलांडत असताना कोंढवा कमेला चौकात अचानक रंगरेज यांच्या कारने त्यांना जोरात धडक दिली. यात गणगे हे खाली कोसळून गंभीर जखमी झाले. यावेळी रंगरेज यांनी तत्काळ त्यांना स्वत:च्या कारमधून जवळच्या रुग्णालयात नेले. परंतु, उपचारापुर्वीच गणगे हे मयत झाल्याचे डॉक्टरांनी मयत घोषीत केले. यावेळी रंगरेज यांनी डॉक्टरांना माझ्या कारने अपघात झाला आहे. तुम्ही पोलिसांना कळवा, असे सांगितले. यानंतर डॉक्टरांनी मुंढवा पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर मुंढवा पोलीस रुग्णालयात दाखल झाले. रंगरेज यांनी पोलिसांना घडलेली घटना सांगितले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच रंगरेज हे अटक होण्यासाठी स्वत:हून पोलीस ठाण्यात आले. रंगरेज यांनी दिलेल्या कबूलीने पोलीसही आवक झाले. अधिक तपास मुंढवा पोलीस करत आहेत.

Visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like