भरधाव वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरुर शहराजवळील पुणे नगर महामार्गावर बाह्य महामार्गावर थिटे कॉलेज जवळ पुण्याहून अहमदनगर च्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ३५ वर्षीय इसमाचा जागीच मृत्यु झाला आहे.

काशिनाथ भगवान सावंत (वय ३५ रा. पाटस ता. दौंड) असे या अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव असून सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

याबाबत मयत व्यक्तीचा चुलत भाऊ आकाश नरहरी सावंत (वय २१ रा. देवदैठण ता. जि. अहमदनगर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात या अपघातात माहिती दिली आहे..

याबाबत मिळालेल्या माहिती नुसार काशिनाथ सांवत हे त्याच्या टिव्ही एस एक्स एल १०० लुना क्र. एम. एच. ४२ एन ३७९२ वरून पुणे कडुन अहमदनगर च्या दिशेने चालला असताना महामार्गावर थिटे काॅलेज समोर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. अपघात स्थळी चारचाकी वाहनाचे डिक्स व एम. एच. १२ एन. ए. ४२४ क्रमांकाची नंबर प्लेट आढळून आली आहे.

या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रविण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस करीत आहेत.