Pune News : भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार नागरिकाचा मृत्यू झाला. हडपसर येथील हांडेवाडी चौकात ही घटना घडली आहे.

भाउसाहेब अशोक गायकवाड (वय ४४) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. प्रकाश रामस्वामी पवार (वय २५, रा. येवलेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत बबन गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब हे हांडेवाडी परिसरात राहतात. ते सोमवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास दुचाकीवरून जात होते. हांडेवाडी चौकात आल्यानंतर पाठीमागून आलेल्या भरधाव टेम्पोने त्यांना जोरात धडक दिली. त्यामुळे खाली पडून भाऊसाहेब हे गंभीररित्या जखमी झाले होते. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. माहीती मिळताच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, चालक प्रकाश याला अटक केली. अधिक तपास सहायक निरीक्षक व्ही. डी. राउत करत आहेत.