अपघातात एसटी बस ‘वाहक’ ठार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे – नाशिक महामार्गावर भोसरी पोलीस ठाण्यासमोर रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकवर भरधाव वेगातील एसटी बस धडकल्यामुळे वाहकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि. 20) पहाटे घडला.

अंबादास दिनकर खेडकर (32) असे मृत्यू झालेल्या बस कंडक्टरचे नाव आहे. तर गंगाराम दिनकर सानप असे बस चालकाचे नाव आहे. बस चालकाला भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे बस आगारातील बस (एम.एच-20 बी.एल-3426) साक्रीहुन पुण्याच्या दिशेने निघालेली धुळे आगाराची एसटी बस पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर भोसरी पोलीस ठाण्यासमोर आली असता रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या ट्रकला पाठीमागून धडकली. त्यावेळी दाट धुके असल्यामुळे हा ट्रक बस चालकाला दिसून आला नाही. तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

Visit : Policenama.com