पार्टी करून परतणाऱ्या मित्रांवर गोळीबार ; एक ठार

अलिबाग : पोलीसनामा ऑनलाईन – पार्टी करून दुचाकीवरून परतणाऱ्या दोन मित्रांवर अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना कुरुळ गावातील रसाणी डोंगर परिसरात रविवारी रात्री बाराच्या सुमारास घडली. यात एकाचा मृत्यू झाला. तर दुसरा तरूण गंभीर जखमी आहे.

सागर दत्तात्रय पाटील असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर गौरव चंद्रकांत भगत हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुढील उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी निलेश वाघमारे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सागर पाटील आणि गौरव भगत हे दोघे आपल्या मित्रांसोबत रसाणी डोंगर परिसरात पार्टी करण्यासाठी गेले होते. त्यानंतर दोघे दुचाकीवरून परतत असताना रात्री बाराच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात सागर पाटील याचा मृत्यू झाला. तर गौरव भगत हा गंभीर जखमी झाला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल धाव घेतली. पोलिसांना घटनास्थळी हल्लेखोरांची दुचाकी सापडली. तर तिघांपैकी निलेश वाघमारे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर इतर दोघे फरार झाले आहेत.

You might also like