दौंड तालुक्यात स्वाईन फ्लूने एकाचा मृत्यू, आरोग्य अधिकाऱ्यांकडून खबरदारी घेण्याचे आवाहन

दौंड : पोलिसनामा ऑनलाइन – अब्बास शेख 
पुणे, पिंपरी चिंचवड या शहरी भागानंतर आता  दौंड तालुक्यातही स्वाईन फ्लूने पुन्हा एकदा डोके वर काढले असून दौंड तालुक्यातील पडवी येथे नुकताच एका ५० वर्षीय इसमाचा या आजरामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दौंडचे आरोग्य अधिकारी डॉ.रणवीर यांनी याबाबत माहिती दिली असून तालुक्यातील नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करताना स्वाईन फ्लू सदृश लक्षणे आढळल्यास त्वरित सरकारी रुग्णालयांत येऊन प्रतिबंधात्मक उपचार घेण्याचे आवाहन केले आहे.
स्वाईन फ्लू बाबत ताबडतोब वैद्यकीय मदत केव्हा घ्यावी याबाबत त्यांनी बोलताना जर एखाद्या व्यक्तीस श्वास घेण्यास जास्त त्रास होत असेल किंवा  छाती किंवा पोटात दाबल्यासारखे वाटत असेल,रुग्णाच्या त्वचेचा रंग निळसर (सायनोसिस) झाल्यास, न बोलता, न हलता रुग्ण पडून राहिल्यास,  अचानक चक्कर यायला लागल्यास, संभ्रमावस्था आल्यास, गंभीर किंवा सतत उलटय़ा सुरू झाल्यास, साध्या फ्लूसारखी लक्षणे आढळली व त्यावरही ताप व भयंकर खोकला सतत येत असल्यास, पुरळ येऊन ताप येत असलेल्या रुग्णांनी त्वरित सरकारी रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी असे मार्गदर्शन केले आहे.
[amazon_link asins=’B00FFDQ506′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’724111f8-c0c4-11e8-b892-37ad390953af’]
तर हा रोग होऊच नये यासाठी काय हालचाल करावी व कोणती खबरदारी घ्यावी याबाबत बोलताना नागरिकांनी   ९५ मास्क किंवा नाका-तोंडासमोर सतत रुमाल धरून संसर्ग रोखता येतो. मास्कचा वापर आठ तासांपेक्षा जास्त वेळ केल्यास तो योग्य तऱ्हेने र्निजतुक करून पुन्हा वापरावा. सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या नळाच्या, गाडीच्या दरवाजा सायबर कॅफेतील माऊस किंवा कीबोर्डचा वापर केल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. डोळे, नाक व तोंड यांना स्पर्श करणे टाळावे. अशानेच जंतूंचा प्रसार होतो. आपली रोगप्रतिकारशक्ती कायम टिकून राहील यासाठी उपाययोजना कराव्यात. यासाठी आसन-प्राणायाम-व्यायामांची मदत घ्यावी. लिंबू, आवळा, मोसंबी, हिरव्या पालेभाज्या ज्यातून ‘व्हिटॅमिन-सी’ मिळते असा आहार घ्यावा. पुरेशी झोप घ्यावी. पाणी भरपूर प्यावे.
[amazon_link asins=’B07B1ZT41X’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’82ac8ef3-c0c4-11e8-ba32-458585e83d63′]
इतरांशी हस्तांदोलन, आलिंगन टाळावे, स्वाइन फ्लूच्या रुग्णापासून काही अंतर लांब राहावे, सकाळी घराबाहेर पडताना नाष्टा करूनच जावे, कारण उपाशीपोटी संसर्गाचा धोका जास्त असतो, थंड वातावरणात हा विषाणू जास्त फैलावत असल्याने पंखा, ए.सी., कुलर यांचा जास्त वापर करू नये आणि आरोग्य शासनामार्फत वेळोवेळी होणाऱ्या सूचना आणि  मार्गदर्शनांचा अवलंब करावा असे आवाहन केले आहे.