मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघातात १ ठार ६ जखमी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव वेगात जाणाऱ्या कारने डंपरला पाठिमागून जोरदार धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर ६ जण गंभीर जखमी झाले. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावर पेण रेल्वे स्टेशनसमोर झाला. अपघातात जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालायात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विनोद वसंत चाळके (वय-४२ रा. देवरुख) यांचा जागीच मृत्यू झाला.

महामार्गावरील भरावाची कामे, डाव्हर्शन, खडीमुळे मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. कर्नाळा घाट, पेण शहर ह्द्दीलगत अलेल्य पुल आणि रस्त्याच्या माती भरावाचे काम रामवाडी ते वडखळ रस्त्याप्रमाणेच नागोठणे आणि इंदापूर दरम्यानचे काम वाहन चालकांसाठी धोकायक ठरत आहेत.
त्याचप्रमाणे रस्त्यावर दिशा दर्शक फलक नसल्याने वाहन चालाकांना रस्त्याचा आंदाज येत नाही.

तसेच वाहन चालकांना पाऊस, चिखलामुळे रस्ता व्यवस्थित समजत नसल्याने रस्त्यावरील चिखलामुळे वाहने घसरतात. त्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. या मार्गावरील कामे लवकरात लवकर पूर्ण करावी अशी मागणी वाहन चालाकांकडून होत आहे.

आरोग्य विषयक वृत्त

जाणून घ्या का येतो ‘विसराळूपणा’

रक्ताची गाठही ठरू शकते मृत्यूचे कारण ; वेळीच व्हा सावध

इंटरनेटचा अतिरेकी वापर करतो मेंदूच्या ‘या’ क्षमतांवर परिणाम

पावसाळ्यात त्वचेची घ्या अशी ‘काळजी’