पाणीबाणी जिवावर बेतली ; शॉक लागून एकाचा मृत्यू

परळी : पोलीसनामा ऑनलाईन – परळी शहरातील पाणीटंचाईचा एक बळी गेला आहे. पाणी भरण्याच्या धावपळीत शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास हौदात उतरून पाणी भरताना विद्यूत मोटारीचा शॉक लागून एका ४८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

संजय राजाभाऊ विडेकर (वय ४८) असे मृत्यू झालेया व्यक्तीचे नाव आहे.

मराठवाड्यात सध्या पाणी टंचाई सुरु आहे. पाण्यासाठी मराठवाड्यात दूरदूर पर्यंत पायपीट करावी लागत आहे. परळीत नगर परिषदेकडून दहा दिवसाआड पाणी सोडले जाते. त्यामुळे नागरिकांना दहा दिवसांच्या पाण्याचा साठा करून ठेवण्याची धडपड करावी लागत आहे. शुक्रवारी सकाळी पाणी पुरवठा सुरु झाल्यावर विडेकरही आपल्या घऱात पाणी भरण्यासाठी धावपळ करत होते. दरम्यान सकाळी ८ वाजता ते हौदात उतरून विद्यूत मोटर लावत असताना वीजेचा शॉक लागून संदय विडेकर यांचा मृत्यू झाला.

संजय विडेकर हे शहरात पानटपरी चालवतात. त्यांच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.