Pune : दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला.

राकेश राजेंद्र पवार (वय ३२, रा. सातववाडी, हडपसर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश एका खासगी कंपनीत कामाला होता. २ मार्चला मध्यरात्री पावणे तीनच्या सुमारास तो मुंढव्यातील बायपास रस्त्याने चालला होता. त्यावेळी राकेशचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि तो खाली पडला. यात तो गंभीररित्या जखमी झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान मंगळवारी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अधिक तपास उपनिरीक्षक एस. डी. नरके करीत आहेत.