धुळे : भरधाव दुचाकी खड्ड्यात आपटल्याने अपघात, एकाचा मृत्यू

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई-आग्रा महामार्गावर अज्ञात वाहनाने हुलकावणी दिल्याने दुचाकी खड्यात आपटून एकाचा मृत्यू झाला. अंकुश बळीराम अहिरे (रा. गोकुळ नगर, धुळे) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे.

अंकुश अहिरे हा मुंबई-आग्रा महामार्गावरील एका खाजगी हाॅटेलमध्ये काम करत असे. नेहमीप्रमाणे काम आटोपून तो सायंकाळी दुचाकीवरुन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 मुंबई-आग्रा महामार्गावरून घराकडे जात होता. यावेळी अज्ञात वाहनाने हुलकावणी दिल्याने दुचाकीवरील ताबा सुटून दुचाकी रस्त्याच्या कडेला खड्यात आपटली. जोरात आपटल्याने तो रक्तबंबाळ झाला होता. बेशुद्ध अवस्थेत पडला होता. नागरिकांनी त्याला चक्करबर्डी येथील हिरे मेडिकल काॅलेज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान रात्री त्याचा मृत्यू झाला. अपघातात मृत्यूची वार्ता परिसरात समजताच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.