खडक माळेगाव बंधाऱ्यात बुडून एकाचा मृत्यू

लासलगाव – नाशिक येथील वालदेवी ची सहा जणांचा जीव गेल्याची घटना ताजी असताना पोहता येत नसल्याने भ लतेच धाडस करणार्‍या युवकाला लासलगाव जवळील खडक माळेगाव बंधाऱ्यात आपला जीव गमवावा लागला. अंधार पडला मात्र मात्र त्याचा शोध उशिरापर्यंत न लागल्याने शोध थांबवण्यात आला परंतु दुसर्‍या दिवशी लासलगाव स्विमिंग ग्रुपच्या सदस्यांनी पुन्हा सकाळी शर्तीचे प्रयत्न करत शोध घेतला असता मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने जिल्ह्यात प्रशासनाने विकेंड लाॅकडाऊन जाहीर केलेले असतानाही या युवकांनी धाडस करत निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथील बंधाऱ्यात पोहण्यासाठी उतरले होते. सागर शरद शेजवळ या युवकाला पाण्याचा अंदाज न आल्याने हा युवक बुडू लागला, सोबत असलेल्या युवकांनी त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले मात्र त्यांना अपयश आले, या घटनेची माहिती कळताच पोलीस आणि स्थानिक लोकांनी सागर चा पाण्यामध्ये शोध घेतला असता रात्री उशिरापर्यंत मृतदेह हाती लागला नाही.

दसऱ्या दिवशी लासलगाव स्विमिंग ग्रुप चे सदस्य धरणाची माहिती असल्याने शोध कार्यात मदत केली मृतदेह बाहेर काढण्यासाठी .डाॅ.अनिल बोराडे, विलास चव्हाणके, संदिप अग्रवाल, दत्ता साप्ते, यांनी प्रयत्न केले यावेळी खडक माळेगावचे सरपंच दत्ता काका रायते, लासलगांव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ,ग्रामसेवक वैशाली राजोळे हे ऊपस्थीत होते.