भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन – दौंड तालुक्यातील पारगाव-चौफुला रोडवर भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने पारगाव येथील रहिवासी दिपक बबन ताकवणे यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा मयूर दिपक ताकवणे हा गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिपक ताकवणे हे आपल्या मुलासोबत दुचाकीवरून पारगाव येथून केडगावकडे चालले होते. खोपोडी गावाजवळ ते आले असता (टेम्पो क्र. एम.एच १४ सी.पी ४८२३) यावरील चालकाने टेंपो चुकीच्या दिशेने चालवत आणून समोरून जोरदार धडक दिली यामध्ये दिपक ताकवणे आणि त्यांचा मुलगा मयूर ताकवणे यांना गंभीर मार लागून यामध्ये दिपक ताकवणे हे जागीच ठार झाले तर त्यांचा मुलगा मयूर हा गंभीर जखमी झाला आहे.

जखमी मयूर ताकवणे याला लोणीकाळभोर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याबाबत अतुल लक्ष्मण ताकवणे यांनी फिर्याद दिली आहे. दिपक ताकवणे हे शांत आणि मनमिळावू स्वभावाचे होते त्यांच्या अपघाती मृत्यूची बातमी समजताच पारगावमध्ये दुःखाचे सावट पसरले होते.

आरोग्यविषयक वृत्त –