पुढील दोन दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचे, सावध राहा

शरद पवारांची पदाधिकाऱ्यांना सूचना

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पुढील दोन दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. काळजी करू नका, पण सावध राहा अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातिल पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत.

लोकसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. सर्व पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. सर्व पक्षांचे अध्यक्ष, नेते जिल्हा दौरा करत आहेत. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रात्री सोलापूरमध्ये होते. त्यावेळी निवडणुकीचा प्रचार सायंकाळी संपत असला तरी पुढील दोन दिवस खूप महत्त्वाचे आहेत. काळजी करू नका, पण सावध राहा. अशी सूचना शरद पवार यांनी केली आहे. इतकेच नव्हे तर, तुमचा प्रचार संपला असला तरी तुम्हाला पुढचे दोन दिवस सावध राहावे लागेल. कोणत्याही पद्धतीने मागे राहू नका. सामाजिक वातावरणावर लक्ष ठेवा. असेही त्यांनी म्हंटले.

विशेष म्हणजे, त्यानंतर शरद पवार यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार राजन पाटील आदींनी पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. आणि मतदार संघातील परस्थिती बद्दल माहिती घेतली. इतकेच नव्हे तर, सुशीलकुमार शिंदे यांची मुख्य लढत कोणाशी होईल असा सवाल शरद पवार यांनी केला त्यावेळी सुशीलकुमार शिंदेंची यांची थेट लढत भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर यांच्याशीच होईल असे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितले.

You might also like