दुर्दैवी ! 5 व्या थरावरुन कोसळून ‘गोविंदा’चा मृत्यू

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी केली जात असताना आता या उत्साहाला गालबोट लागले आहे. दंहीहंडी फोडण्यासाठी गेलेल्या एका गोविंदाला आपला जीव गमवाला लागला. अर्जुन खोत असे या मृत गोविंदाचे नाव आहे. ही धक्कादायक घटना रायगडमधील म्हसळा तालुक्यात खरसई गावात घडली.

दहीहंडी फोडताना 5 व्या धरावर चढलेला हा गोविंदा खाली कोसळला आणि यात या गोविंदाचा मृत्यू झाला. आज राज्यात दंहीहंडी दरम्यान दिवसभरात 25 हून अधिक गोविंदा गंभीर जखमी झाले. मुंबईत सरकारी रुग्णालयात जखमी गोविंदावर उपचार सुरु आहेत. मुंबईत दादर, ठाणे परिसरात अनेक उंच दहीहंड्या पाहायला मिळाल्या.

अशाच एका दंहीहंडीत रायगडच्या म्हसळा तालुक्यात सुरु होती. त्यावेळी उत्साहत दहीहंडी साजरी होत असताना यात 5 व्या थरावरुन अर्जून खोत हा गोविंदा जमिनीवर आदळल्याने त्याचा मृत्यू झाला.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like