भोसरीत दगडावरून दुचाकी घसरल्याने तरुणाचा मृत्यू

पुणे (भोसरी) : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे-नाशिक महामार्गावरील पांजरपोळ समोर दगडावरुन गाडी घसरल्याने दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. तर त्याचा मित्र जखमी झाला. कुंदन कुमार वकील (वय-22 रा. महात्मा फुलेनगर, मोशी, मूळगाव सब्बालपूर हस्ती टोला, ता. सोनपूर जि. छपरा, बिहार) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर दिपक अजय कंधारे (वय-20) हा गंभीर जखमी झाला आहे.

भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंदनकुमार आणि त्याचा मित्र दिपक कंधारे हे दोघे अ‍ॅक्टीवा गाडीवरून मोशीच्या दिशेने जात होते. पांजरपोळ समोर रोडवर त्यांची दुचाकी ही रोडच्या खाली जाऊन दगडावरून घसरली. यामध्ये कुंदन याच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर मार लागल्याने जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. तर दिपक कंधारे हा देखील गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

पोलीस हवालदार सुरेश निवृत्ती मुंढे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मयत कुंदन कुमार वकील याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार सुरेश मुंढे करीत आहेत.

Visit : Policenama.com