धक्कादायक ! चार्जिंगला लावलेल्या ‘आयफोन’चा स्फोट : तरुण जखमी

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – चार्जिंगला लावलेल्या आय़फोनचा स्फोट झाल्याने एक तरुण जखमी झाल्याची घटना अंबरनाथमध्ये समोर आली आहे. तो फोन तरुणाने गादीवर फेकल्याने कापसाच्या गादीनेही पेट घेतला. तर तरुणाच्या दोन्ही पायांना या घटनेत जखम झाली आहे.

अमित भंडारी असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

अमित भंडारी हा अंबरनाथच्या कोहेजगाव येथे राहणारा आहे. त्याने एका वर्षापुर्वी अॅपल कंपनीचा आय फोन ६ हा फोन विकत घेतला होता. रविवारी रात्री त्याने आपल्या घरी आयफोन चार्जिंगला लावला. त्यानंतर तो मोबाईलवरील मेसेज वाचत होता तेव्हा अचानक मोबाईलचा स्फोट झाला. स्फोट झाल्यावर त्याने हातातील मोबाईल गादीवर फेकला. तेव्हा कापसाच्या गादीने पेट घेतला. तर अमितचे दोन्ही पाय भाजले आहेत. पायांना मोठी दुखापत झाली आहे. याप्रकरणी तो अॅपल कंपनीकडे तक्रार करणार असल्याचे त्याने सांगितले.

मागील काही दिवसांपासून मोबाईलचे स्फोट होण्याच्या घटना वाढल्या आहे. परंतु आयफोनसारख्या महागड्या फोनचा स्फोट झाल्याने मोबाईल वापरणाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like