धक्कादायक ! गेल्या 10 वर्षांपासून ‘ती’ केस ‘खात’, पोटात निघाला 1 किलोचा ‘गोळा’

जयपूर : वृत्तसंस्था – एका 18 वर्षीय तरुणीच्या पोटातून डॉक्टरांनी एक किलो केसांचा गुंता काढला आहे. राजस्थानच्या हनुमानगड जिल्हा रुग्णालयातील ही घटना आहे. सदर तरुणी 18 वर्षींची आहे. पूनम असं या तरुणीचं नाव आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार पूनमला ट्रायकॉबेजोर नावाचा आजार आहे. पूनम मानसिकदृष्ट्या विकलांग आहे.

पूनम गेल्या 10 वर्षांपासून डोक्यावरचे केस उपटून खात होती. पूनमला पोटाच्या दुखण्याचा आजार होता. तिचं वजन खूपच कमी झालं होतं. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पूनमचं सिटी स्कॅन करण्यात आलं. अनेक तपासण्या केल्यानंतर समजलं की, तिच्या पोटात केसाची गाठ तयार झाली आहे. यानंतर पूनमची शस्त्रक्रिया करण्यात आली.

जिल्हा रुग्णालयातील शल्य चिकित्सक डॉ. के के शर्मा यांनी सांगितलं की, “मानसिक विकलांग असलेल्या काही तरुणी केस उपटून खातात. पचन न झालेले केस पोटात तसेच राहतात. त्याचा गोळा तयार होतो आणि आकारही वाढतो.” जिल्हा रुग्णालयात प्रथमच अशा प्रकारची शस्त्रक्रिया झाल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.

Visit : Policenama.com