मुंबई- पुणे द्रुतगतीवर एसटी बसचा अपघात, एकजण ठार तर 16 जखमी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर 16 जण जखमी (one-killed-and-16-injured-st-bus-accident-mumbai-pune-express-way) झाले आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Expressway ) पनवेलजवळ मध्यरात्री दोनच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राज्य परिवहन महामंडळाची बस ही साता-याहून मुंबईच्या दिशेने जात होती. त्यावेळी पनवेलजवळ एका अज्ञात वाहनाने बसला धडक दिली. यात एकाचा मृत्यू झाला. तर 16 जण जखमी झाले. अपघातात बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बसमधील आसन व्यवस्था तसेच एका बाजूचा बसचा पत्रा पूर्णपणे निखळला आहे.

You might also like