सुपमध्ये कापसाचा बोळा आढळल्याप्रकऱणी जहांगीरला १ लाखांचा दंड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील जहांगीर हॉस्पीटलमध्ये उपचार घेत असलेल्या रूग्णाला देण्यात येणाऱ्या सूपमध्ये रक्ताने माखलेले कापसाचे बोळे आढळल्याप्रकरणी हॉस्पीटलला अन्न व औषध प्रशासनाने १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यासोबतच हॉस्पीटलच्या कॅंटीनमध्ये तपासणी केल्यानंतर आढळलेल्या त्रुटींची पुर्तता करण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे.

जहांगीर रुग्णालयात दाखल असलेल्या एका रुग्णाला सूप देण्यात आले होते. मात्र या सूपमध्ये रक्ताने माखलेले दोन कापसाचे बोळे सापडले. रुग्णाच्या नातेवाईकांनी याचा व्हिडीओ काढून हा सर्व प्रकार उजेडात आणला होता. हे सूप हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये बनवण्यात आले होते. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.या  प्रकारामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णाला देण्यात येणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावेळी सूपमध्ये रक्ताने माखलेले कापसाचे बोळे पाहिल्यानंतर रुग्णाला धक्का बसला. त्याने आपल्या नातेवाईकांना हा प्रकार सांगितल्यानंतर नातेवाईकांनी त्याचा व्हिडीओ तयार केला.या प्रकारामुळे सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात होता.

दरम्यान याप्रकरणी महंमदवाडीत राहणारे महेश सातपुते यांनी यासंदर्भात तक्रार एफडीएकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी कॅंटीनची तपासणी केली. तेव्हा तेथे अस्वच्छता आढळून आली. त्यासोबतच रुग्णांसाठी व अन्न पदार्थ तयार करणाऱ्यांसाठी एकच स्वच्छतागृह आहे. कॅंटीनमधील अस्वच्छतेमुळे अन्न सुरक्षा अधिकाऱी पी. एस. काकडे यांनी पुणे विभागीय सहआय़ुक्त सुरेश देशमुख यांच्याकडे खटला दाखल केला. बुधवारी हॉस्पीटल प्रशासनाला यासंदर्भात बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे म्हणणे ऐकून घेत एफडीएने हॉस्पीटलला यासंदर्भात १ लाख रुपयांचा दंड ठोठावला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like