पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे नेतृत्त्वातील तपास पथकास 1 लाखाचे बक्षीस

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – अवैध धंदेवाल्यांवर केलेल्या उल्लेखनीय तपासाबाब पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे नेतृत्त्वातील तपास पथकास एक लाखाचे बक्षीस जाहीर झाले आहे. तसेच प्रेरणा कट्टे यांचा पोलिस महासंचालकांकडून गौरव करण्यात आला आहे. 44 संशयितांवर पुराव्यानिशी दोषारोपपत्र सादर करण्याचे उल्लेखनीय काम कट्टे यांनी केले. त्यांच्या या कार्याची दखल पोलिस दलाने घेतली.

यादवनगरातील मटका अड्डयावर सप्टेंबरमध्ये टाकण्यात आलेल्या छाप्यानंतर संशयित सलीम मुल्ला टोळीवर मोकाची कारवाई करण्यात आली. याचा तपास शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्याकडे देण्यात आला. त्यांनी मटका व्यवसायाचे कोल्हापूर, सांगली, मुंबईसह गुजरात कनेक्‍शन उघड करून 42 गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळल्या. त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन पोलिस महासंचालकांकडून त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच ही कारवाई करणाऱ्या पथकाला एक लाख रूपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे.

Visit : Policenama.com 

You might also like