तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करा डाएटींग

पोलीसनामा ऑनलाइन – वजन कमी करण्यासाठी तसेच शरीर डीटॉक्स करुन मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी अनेकजण विविध प्रकारची फास्टींग फॉलो करतात. ज्यामध्ये दिवसातील एका ठराविक वेळीच जेवण केले जाते. परंतु, हा अशाप्रकारचे प्लॅन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानेच केले पाहिजेत. अन्यथा त्याचे गंभीर परिणाम शरीरावर दिसू लागतात.

दिवसभरात केवळ एकदाच जेवण करण्याच्या डाएटचे अनेक दुष्परिणामही आहेत. फार जास्त भूक लागल्यासारखे वाटणे, शरीर थरथरणे, खुपच कमजोरी वाटणे, थकवा आणि चिडचिडपणा, कामावर लक्ष केंद्रीत न होणे, बॅड कोलेस्ट्रॉल वाढणे आदी समस्या यामुळे वाढतात. याबाबत करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार इटरमिटेंट फास्टींग म्हणजेच दररोज केवळ एकदाच जेवण करण्याच्या डाएट प्लॅनमुळे वजन कमी होत असेल तरी त्याने शरीरात एलडीएल म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याचा थेट संबंध हृदयरोगांशी आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like