सोमेश्वर कारखान्याचे दहा लाख टन ऊस गाळपाचे उदिष्ट : चेअरमन जगताप

नीरा : पोलिसनामा ऑनलाईन ( मोहंम्मदगौस आतार) – डिस्टिलरीच्या विस्तारवाढीची कार्यवाही अहवाल आल्यानंतर करण्यात येणार असून येत्या हंगामात कारखान्याचे सभासद आणि गेटकेन यांचा मिळून १० लाख टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट असून सभासद, कामगार आणि संचालक मंडळाच्या सहकार्याने येणारा हंगाम यशस्वी पार पाडू असा विश्वास सोमेश्वरचे चेअरमन ऊसत्तम जगताप यांनी व्यक्त केला.

सोमेश्वरनगर ( ता. बारामती ) येथील सोमेश्वर सह. साखर कारखान्याचा ५८ वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ शुक्रवारी ( दि. २५ ) चेअरमन पुरुषोत्तम जगताप आणि त्यांच्या सुविध्य पत्नी रोहिणी जगताप यांच्या हस्ते पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, जेष्ठ नेते रामचंद्र भागात, संचालक नामदेव शिंगटे, किशोर भोसले , महेश काकडे, उत्तम धुमाळ, विशाल गायकवाड, दौलत साळुंखे, ऋतुजा धुमाळ, हिराबाई वायाळ यांच्यासह सुनील भोसले, गौतम काकडे, विक्रम भोसले, बाळासाहेब गायकवाड, अधिकारी आणि सभासद उपस्थित होते.

यावेळी चेअरमन पुरुषोत्तम जगताप म्हणाले कि, शैक्षणिक संस्थेसाठी शिक्षण निधी म्हणून ५० रुपये कपात करून सर्व सोयीसुविधायुक्त इमारती व वसतिगृहाचे काम सुरु करण्यात आले आहे. डिस्टिलरीसाठी १०० रुपये परतीची ठेव कपात करण्यात आली असून व्हीएसआय कडून डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट ) मिळाल्यानंतर डिस्टिलरीच्या विस्तारवाढीची कार्यवाही करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने इथेनॉलसाठी चांगला दर दिल्याने इथेनॉल निर्मितीपासून सभासदांना जास्त दर देता येत असल्याचे जगताप म्हणाले .

येत्या हंगामासाठी सव्वीस हजार एकर ऊस उपलब्ध असून , साडे आठ लाखापर्यंत गाळप होईल. दीड लाख टन ऊस गेटकेनचा आणणार आहोत. मात्र, पावसामुळे हंगाम सुरु होण्यास १५ नोव्हेबर उजाडेल अशी शक्यता आहे. बेसल डोस उधारीवर देण्याचे बंद केले असून बेणे उधारीवर देत असल्याची माहिती जगताप यांनी दिली.

यावेळी माजी संचालक दत्ताजीराव चव्हाण यांनी कारखान्याने शेतकरी सभासदांसाठी पेन्शन योजना सुरु करण्याची सूचना केली. प्रास्ताविक कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी केले . आभार व्हाईस चेअरमन शैलेश रासकर यांनी मानले.

Visit : policenama.com