धनादेश न वटल्यास प्रकरणी एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – लासलगाव मर्चटस को ऑप बँकेचे  कर्जदार दिलीप माधवराव पानगव्हाणे रा.उगाव  यांना निफाड न्यायालयाच्या वरिष्ठ स्तर न्यायाधीश श्रीमती मृदुला एस.कोचर यांनी  कर्ज परतफेडी करीता दिलेला धनादेश  न वटल्याचे प्रकरणी दोषी धरून एक महिना कारावासाची  व चेकची रक्कम रूपये पंच्यान्नव हजार  दंड व दंड न भरल्यास पंधरा दिवस कैदेची शिक्षा ठोठावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, लासलगाव मर्चंटस को ऑप बँकेचे कर्जदार दिलीप माधवराव पानगव्हाणे  यांनी एक लाख रूपये रक्कमेचे प्रापर्टी तारण कर्ज दिनांक 7 एप्रिल 2014 रोजी घेतले परंतु या कर्जाचे मासिक हप्ते  वेळेवर भरले नाही त्यामुळे कर्ज थकित झाले. थकीत कर्ज रक्कम भरण्यासाठी पानगव्हाणे  यांनी लासलगाव मर्चंटस बॅंकेचे वसुली अधिकारी यांना बँक ऑफ महाराष्ट्र शाखा उगावचा दि.24 एप्रिल 2016 रोजीचा पंच्यान्नव हजार रूपयांचा धनादेश दिला.परंतु खात्यात  पुरेशी रक्कम शिल्लक नसल्याने हा धनादेश न वटता परत आला. वकीलांच्या मार्फत नोटीस देऊनही कर्जदाराराने धनादेशाची रक्कम पंच्यान्नव हजार ही मुदतीत दिली नाही.म्हणुन बॅंकेने कर्जदाराविरूध्द निफाड न्यायालयात केस  एसएससी  क्रमांक 61/2017  दाखल केली होती.फिर्यादी बॅकेचे वतीने वरीष्ठ अधिकारी शमशुद्दीन शेखलाल काद्री यांची साक्ष वकीलांनी नोंदविली होती. तर अ‍ॅड. शेखर देसाई यांनी बँकेचे वतीने कामकाज पाहीले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/