Coronavirus Lockdown : सतवतेय ‘कोरोना’च्या दुसर्‍या लाटेची चिंता, आता इंग्लंडमध्ये लागला महिनाभराचा लॉकडाऊन

लंडन : ब्रिटेनमध्ये कोविड-19ची प्रकरणे सतत वाढत असल्याने पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी शनिवारी देशरात पुन्हा एक महिन्याचा लॉकडाऊन लावण्याची घोषणा केली आहे. बोरिस जॉन्सन यांनी शुक्रवारी कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये होत असलेली वाढ आणि हॉस्पीटलमध्ये रूग्णांची वाढती संख्या पहाता प्रतिबंध लावण्याच्या मुद्द्यावर मंत्रिमंडळातील वरिष्ठ सहकार्‍यांशी चर्चा केली होती. ही अपेक्षा व्यक्त केली जात होती की, लॉकडाऊन लावण्याची घोषणा सोमवारी केली जाईल, परंतु स्थितीचे गांभिर्य पहाता ही घोषणा शनिवारीच करण्यात आली.

गुरुवारपासून सक्तीने लागू लॉकडाऊन
देशभरात गुरुवारपासून लॉकडाऊनचे पालन सक्तीने केले जाईल. यासाठी नियमांची घोषणासुद्धा करण्यात आली आहे. लोकांना घराच्या बाहेर पडण्याची परवानगी नसेल. त्यांना काही खास स्थितीतच घराच्या बाहेर पडण्याची सूट असेल. ते कामासाठी कार्यालय, शाळा, कॉलेज आणि एक्सरसाइज करण्यासाठी घराच्या बाहेर जाऊ शकतात. आवश्यक वस्तुंचे दुकाने सोडून बाकी सर्व बंद राहील. हा प्रतिबंध 2 डिसेंबरपर्यंत लागू करण्याची योजना आहे.

काही गोष्टी सोडून सर्वकाही बंद
या नव्या प्रतिबंधाअंतर्गत पब, बार आणि रेस्टॉरंट बंद राहतील. परंतु रेस्टॉरंटमूधन पदार्थ घरी घेऊन जाता येईल. ब्रिटनमध्ये सर्व मनोरंजनाची ठिकाणे बंद राहतील आणि आवश्यक नसलेली दुकाने बंद राहतील. बोरिस जॉन्सन यांनी म्हटले की, आम्हाला आता ही कारवाई करावी लागेल कारण आता आपल्याकडे इतर कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. निसर्गासमोर आम्ही नतमस्तक झालो आहोत. इतर देशांच्या तुलनेत येथे कोरोना वेगाने पसरत आहे. हे त्यांनी लॉकडाऊनच्या प्लॅनिंगवर कॅबिनेट बैठकीत हस्ताक्षर केल्यानंतर म्हटले.

यूरोपात कोरोनाची दुसरी लाट
यूरोपात कोरानाची प्रकरणे पुन्हा वाढूल लागल्याने यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक देशांनी पुन्हा लॉकडाऊन लावण्यास सुरूवात केली आहे. यापूर्वी फ्रान्समध्ये गुरूवारी चार आठवड्यांसाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती.