प्रेग्नंसीच्या पहिल्या महिन्यात चुकूनही ‘या’ 4 पदार्थांचा आहारात समावेश नका करू, जाणून घ्या

प्रेग्नंसीचा काळ हा स्त्रीसाठी जगातील सर्वात सुंदर काळ असतो. यात मुलासह स्वतःचीही काळजी घ्यावी लागते. प्रेग्नसंमध्ये खाण्यापिण्याकडे योग्य लक्ष दिल्यास मूल निरोगी जन्माला येते, असे म्हणतात. हे खरेही आहे. मात्र थोड्या निष्काळजीपणाने काहीही होऊ शकते. यासाठी या काळात आहार खुप महत्वाचा ठरतो.

आज आम्ही गरोदरपणातील पहिल्या महिन्याचा आहार सांगणार आहोत, जो आई आणि मुल दोघांसाठीही महत्वाचा आहे. गरोदरपणात, आईला एक प्रश्न पडतो की, आहारात काय घेतले पाहिजे आणि काय टाळले पाहिजे? पहिल्या महिन्यात काय टाळले पाहिजे ते जाणून घेऊया…

1 पहिला महिना गरोदरपणात खूप नाजूक असतो. चहा, कॉफी आणि चॉकलेट टाळले पाहिजे. हे जास्त प्रमाणात सेवन केल्याने गर्भपात होण्याचा धोका वाढू शकतो. या व्यतिरिक्त, जन्मावेळी बाळाचे वजन कमी होण्याची शक्यता असू शकते.

2 पॅकेटबंद पदार्थ टाळले पाहिजेत. यात केक, ज्यूस, मायक्रोवेव्हड पदार्थ इत्यादींचा समावेश आहे.

3 मलईच्या दुधाने तयार केलेले पनीर टाळले पाहिजे. लिस्टेरिया नावाचा एक बॅक्टेया असतो, ज्यामुळे गर्भपात होऊ शकतो. तसे बाळांतपणाचा धोका सुद्धा वाढू शकतो.

4 गरोदरपणात कच्ची पपई खाणे टाळावे. हे आई आणि मुलासाठी धोकादायक होऊ शकते. कच्च्या पपईमध्ये लेटेक्स नावाचा घटक असतो जो गर्भाशयावर परिणाम करतो. अकाली गर्भपात यामुळे होऊ शकतो.