ट्विटर ‘वॉर’ सुरूच ! अमृता फडणवीसांचं आणखी एक ‘वादग्रस्त’ ‘ट्विट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टिकेमुळे ट्रोल झालेल्या अमृता फडणवीस यांच्यावर शिवसेनेने जोरदार हल्ला केला होता. त्यात आता अमृता फडणवीस यांनी आणखी एक वादग्रस्त ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे की, ‘‘वाईट नेता मिळणे हा महाराष्ट्राचा दोष नाही. चांगला नेता कायम न ठेवणे ही चुक आहे, जागो महाराष्ट्र’’.

असे ट्विट करत त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. यावरुन पुन्हा एकदा वादळ उठण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद गेले आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर अमृता फडणवीस या संतापल्या असून त्यात सातत्याने एखाद्या भाजपा नेत्यांपेक्षा अधिक कडवटपणे ठाकरे यांच्यावर टिका करु लागल्या आहेत. त्याला शिवसेनेनेही तितक्याच जोरदारपणे प्रतिउत्तर दिले आहे.

ठाकरे यांच्या घरात कोणी जन्मल्याने कोणी ठाकरे होत नाहीत अशी टिका अमृता फडणवीस यांनी करुन शिवसेनेचा राग ओढवून घेतला होता. अमृता फडणवीस यांच्या टिकेनंतर शासनाने तसेच मुंबई, ठाणे महापालिकेने अ‍ॅक्सिस बँकेतील आपली खाती काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर एका इंग्रजी वृत्तपत्राच्या बातमीला त्यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यात त्यांनी म्हटले होते की, शासनाने राष्ट्रीय भूमिकेतून विचार केला पाहिजे. बँक खाती ट्रान्सफर करणे हे मला आणि देवेंद्र फडणवीस यांना टारगेट करण्यासारखे आहे. असे म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे नवीन ट्विट करुन वादात तेल ओतले आहे.
देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर अमृता फडणवीस या विशेष चर्चेत आल्या. मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून त्यांना विविध कार्यक्रमाला लोक बोलावू लागले. त्यांच्या गाण्याच्या व्हिडिओ काढले जाऊ लागले. या पाच वर्षात त्या असंख्य कार्यक्रमात गेल्या असल्या तरी त्यांनी कधीही राजकीय भाष्य केले नव्हते.

मात्र, पाच वर्षानंतर देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर अमृता फडणवीस या अधिक संतापल्या आहेत. त्यातूनच त्यांनी हे ट्विट वॉर सुरु केले आहे. मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी स्टेट बँकेतील शासनाची तसेच पोलिसांनी पगार खाती ही अ‍ॅक्सीस बँकेत ट्रान्सफर करण्याचे तोंडी आदेश दिले होते. त्याचा फायदा अमृता फडणवीस यांना झाला होता. त्यावर खूप टिका झाली होती. आता फडणवीस यांनी टिका सुरु करताच शासनाने तसेच मुंबई व ठाणे महापालिकेने आपली खाती अ‍ॅक्सीस बँकेतून काढून स्टेट बँकेत ट्रान्सफर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अमृता फडणवीस यांच्या वक्तव्याचा बँकेला फटका बसत असून त्यामुळे त्यात अधिकच संतापल्या आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/