पुणे : चप्पल उगारल्याच्या रागातून ज्येष्ठ नागरिकाचा खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दुकानासमोरील कठड्यावर झोपलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला झोपेतून उठविल्यानंतर त्याने चप्पल दाखविली. याचा राग आल्याने त्याला बेदम मारहाण करून खून केला. ही घटना हडपसरमधील मगरपट्टा परिसरात शनिवारी रात्री घडली.

वसंत डोके (वय – ६०, रा. वडाची वाडी, उंडरी) असे खुन झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. राहुल परशुराम बारवकर (वय -३२, रा. विटभट्टीजवळ, माळवाडी, हडपसर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी विशाल वसंत डोके (वय- ३४) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल डोके यांचे वडील शनिवारी रात्री साडे आठच्या सुमारास मगरपट्टा येथील एका दारूच्या दुकानासमोर झोपले होते. त्यावेळी राहुल बारवकर तेथे आला. त्याने डोके यांना झोपेतून उठविले. त्यामुळे डोके यांना राग आल्याने त्यांनी राहुल याच्यावर चप्पल उगारली. संतापलेल्या राहुलने माझ्यावर चप्पल उगारतोस, थांब तुला संपवतोच असे म्हणत त्यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर डोके यांना पाच फूट उंच कठड्यावरून ढकलून दिल्याने ते खाली पडले. मारहाण आणि उच कठड्यावरून ढकलून दिल्याने वसंत डोके यांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. विशाल डोके यांच्या फिर्य़ादीवरून पोलिसांनी राहुल बारवकर याला अटक केली आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

Loading...
You might also like