व्हॉट्सअॅप ग्रुप सोडणे बेतले जीवावर 

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन

सहज, जलद आणि चटपटीत संवादांचे सर्वात प्रभावी माध्यम बनलेले ‘व्हॉट्सअॅप’ दिवसेंदिवस घातक  व जीवावर बेतणारे ठरू लागले आहे .सोशल मीडियाच्या वापरामुळे जसे लोक एकमेकांना जोडले जात आहेत, त्याचप्रमाणे त्यांच्यातील सहनशीलताही कमी होत चाललीय, असे गेल्या काही दिवसांतील घटनांवर समोर आले आहे.व्हॉट्सअॅप ग्रुपमधून बाहेर पडल्याने एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. पुण्यातील  इंदापूर तालुक्यात सदर घटना घडली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’63ac3645-c53c-11e8-bef4-41b9c2762465′]

इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी या गावात व्हॉट्सअॅप ग्रुपमधून बाहेर पडलेल्या तरुणावर हल्ला करण्यात आला. लाथा-बुक्क्यांनी तरुणाला मारहाण कऱण्यात आली तसेच तलवार आणि कोयत्यानेही वार करण्यात आले. यात तरुण गंभीररित्या जखमी झाला आहे .व्हॉट्सअॅप ग्रुपमधून बाहेर पडणे या तरुणाला चांगलेच महागात पडले आहे . निमगाव केतकीतल्या पानबाजारात काही तरुण कार आणि दुचाकीवरुन आले आणि व्हॉट्सअॅप ग्रुपमधून बाहेर पडलेल्या तरुणावर हल्ला केला.

[amazon_link asins=’B078W4TXQF,B06Y5KT643′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’32055527-c53c-11e8-a769-bde38d7290a8′]

 सामाजिक संवादाचे प्रभावी माध्यम असलेल्या ‘व्हॉट्सअॅप’ ची उयुक्तता जेवढी  अधिक आहे त्यापेक्षाही ती अधिक घातक  बनत चालल्याचं एकूणच या घटनांवरून निदर्शनास येत आहे. सोशल मीडियाचा अतिवापर लोकांची सहनशीलता कमी करत आहे.

गोव्यात दाबोळी विमानतळावर २२ लाख विदेशी चलनासह चौघांना अटक

जाहिरात.