सिगारेट आणण्यास नकार दिल्यानंतर चौघांनी भोसकून वडिलांच्या वयाच्या व्यक्‍तीचा केला खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – अल्पवयीन मुलाने वडिलांच्या वयाच्या माणसाला सिगारेट घेऊन येण्यास सांगितले. त्याला नकार दिल्याने चौघांनी चाकूने भोसकून खून करण्याची घटना पिंपरीतील नेहरुनगरमध्ये घडली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी आकाश खरात (वय २२) आणि विजय सावंत (वय २०, दोघे रा. खंडेवस्ती, भोसरी) यांना अटक केली आहे. त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.
शाम किसन खंडागळे असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी करण रमेश धुरंदरे (वय २२, रा. हनुमाननगर, नेहरुनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, किरण धुरंदरे, त्याचे मित्र अजिजित प्रल्हाद, शेळके, सुरज दिनेश जावळे व त्यांचा मामा शाम किसन खंडागळे हे २० सप्टेंबरला रात्री साडेअकरा वाजता विठ्ठलनगर झोपडपट्टीतून जात होते.

त्यावेळी आकाश खरात व इतर त्यांना भेटले. त्यातील एका अल्पवयीन मुलाने करण यांचा मामा शाम किसन खंडागळे यांना ये एक सिगारेट घेऊन ये असे सांगितले. त्यावर मामाने तू कोणाला सिगारेट आणायला सांगतोय, माझे वय काय, तुझे वय काय, असे सांगितले. तेव्हा त्या अल्पवयीन मुलाने मामाला चापट मारली. त्यावर मामाने त्याला हाताने ढकलून देऊन त्याला मारण्याकरीता गेला. ते पळून गेले. काही वेळातच ते परत आले व त्यांच्यातील अल्पवयीन मुलाने मामाच्या पोटात रॅम्बो चाकूने भोकसले. आकाश खरात, विजय सावंत यांनी करणच्या मामाला लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण करुन जिवे ठार मारले. पिंपरी पोलिसांनी दोघांना अटक करुन दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

Visit :- policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like