जोर पकडतेय ’वन नेशन, वन गोल्ड प्राइज’ची मोहिम, प्रत्येक ठिकाणी एकाच किमतीत मिळेल सोने

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात वन गोल्ड, वन प्राइजची मोहिम जोर पकडत आहे आणि शक्यता आहे की, संपूर्ण देशात लवकरच याची किंमत एकच होऊ शकते. देशात बहुतांश सोने आयात केले जाते. ही किंमत एकच असते. परतु वेगवेगळ्या भागात सोन्याची किंमत ज्वेलर्स असोसिएशन ठरवते. यामुळे संपूर्ण देशात सोन्याचे वेगवेगळे भाव असतात. हिच स्थिती गुंतवणुकदारांना सोन्यात गुंतवणूक करण्यापासून रोखते. काही ज्वेलर्सची मागणी आहे की, सरकारने वन नेशन, वन गोल्ड प्राइज लागू करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत.

देशात प्रत्येक ठिकाणी एकच गोल्ड प्राइज लागू करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही कारण आयात किंमत सर्वत्र एकच आहे. परंतु उत्तरेतील राज्यात आणि दक्षिणेच्या राज्यात सोन्याची विक्री वेगवेगळ्या किंमतीत होते. दोन्हीच्या दरात खुप अंतर असते. दक्षिण भारतात मागच्या अनेक वर्षापासून गोल्डच्या किमती योग्य आहेत. बायबॅक सिस्टमसुद्धा होती. येथे ज्वेलर्स जास्त मार्जिन घेत नाहीत. उत्तर भारतात ज्वेलर्स जास्त मार्जिन वसूल करतात, ज्यामुळे किमती खुपच वाढतात. ज्सेलर्सकडे बायबॅक रेटसुद्धा डिस्प्ले करण्याची मागणी होत आहे, कारण रि-सायकलिंगने सोन्याच्या शुद्धतेवर कोणताही परिणाम होत नाही.

महाग असल्याने कमी होतेय मागणी
भारतात सप्टेंबर तिमाहीत गोल्डची मागणी 30 टक्क्यांनी घटली. वर्ल्ड कौन्सिलनुसार जुलैपासून सप्टेंबरच्या दरम्यान देशात सोन्याची मागणी 30 टक्केने घटून 88.6 टनावर आली आहे. यासोबतच या कालावधीत ज्वेलरीची मागणी 48 टक्के घटून 52.8 टन झाली. मागच्या वर्षी याच तिमाहीत सोन्याची मागणी 101.6 टन होती. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलनुसार जुलैपासून सप्टेंबर महिन्यात ज्वेलरीची मागणी 29 टक्के घटून 24,100 कोटी रूपये राहीली आहे. मात्र, या दरम्यान सोन्यात गुंतवणुकीसाठी सोन्याची मागणी 33.8 टन राहिली. मागच्या वर्षी जुलै-सप्टेंबर तिमाही दरम्यान गुंतवणुकीसाठी सोन्याची मागणी 22.3 टन राहिली होती.