One Nation One KYC | सरकार करतंय तयारी, लवकरच जारी होऊ शकते सिंगल विंडो सिस्टम; जाणून घ्या होणार कोणते फायदे
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – One Nation One KYC | केवायसी ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे बँक किंवा संस्था एखाद्या व्यक्तीची ओळख आणि पत्त्याबद्दल माहिती मिळवू शकते. अनेक ऑनलाइन सेवांसाठी सरकारने केवायसी प्रणाली अनिवार्य केली आहे. केवायसी ऑफलाइन आणि ऑनलाइन पद्धतीने करता येते. (One Nation One KYC)
केवायसीचा वापर सुरक्षेसाठी केला जात आहे. ही प्रक्रिया बँक खाते उघडण्यासाठी, मोबाईल कनेक्शन, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड किंवा डिपॉझिटरी इत्यादीसाठी वापरली जात आहे.
याशिवाय अनेक सरकारी योजनांनाही केवायसी प्रक्रियेतून जावे लागते. अलीकडेच, सरकारने शेतकर्यांना मदत देण्यासाठी पीएम किसान योजनेअंतर्गत केवाय अनिवार्य केले आहे. त्याशिवाय शेतकर्यांच्या खात्यात हप्ता जाणार नाही.
याशिवाय कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी आवश्यक आहे. आता याबाबत सरकार केवायसी प्रक्रिया अधिक सोपी करण्याचा विचार करत आहे.
केवायसीबाबत काय म्हणाले केंद्रीय मंत्री…
याबाबत माहिती देताना केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल म्हणाले की, केवायसी प्रणाली सिंगल विंडो पोर्टलवर आणण्याचा विचार केला जात आहे. ते म्हणाले की केवायसी संदर्भात एक समान व्यासपीठ तयार केले पाहिजे, ज्याचा वापर विविध संस्था करू शकतात. (One Nation One KYC)
ही प्रणाली लागू झाल्यानंतर लोकांना केवायसीसाठी भटकंती करावी लागणार नाही, त्यांचा वेळही वाचणार आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या एका कार्यक्रमात, मंत्र्यांनी केवायसीसाठी सिंगल विंडो पोर्टल तयार करण्यावर भर दिला. जेणेकरुन स्टॉक ब्रोकर्स, म्युच्युअल फंड आणि डिपॉझिटरीजसाठी एक मजबूत कॉमन केवायसी सिस्टम स्थापित करता येईल.
काय फायदा होईल
जर केवायसी एकाच विंडोखाली केले तर इक्विटी, ट्रेडिंग आणि बँकिंगशी संबंधित सर्व वित्तीय संस्थाना जास्तीत जास्त नवोदितांना आकर्षित करण्यास मदत होईल.
यामुळे लोक वित्तीय कंपन्यांमध्ये अधिक गुंतवणूक करतील.
यामुळे बँक खाते उघडणे, शेअर बाजारात ट्रेडिंग सुरू करणे आणि क्रेडिट कार्ड मिळवणे सोपे होईल.
तसेच जे लोक जोखमीच्या भीतीने गुंतवणूक करत नाहीत तेही गुंतवणूक करण्यासाठी पुढे येतील.
सिंगल विंडो सिस्टीम का महत्वाची आहे?
केवायसीच्या नावावर अनेक फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत, यामध्ये पेटीएम केवायसी,
बँक केवायसी आणि इतर अनेक प्रकारच्या फसवणुकीचा समावेश आहे.
हॅकर्स प्रथम केवायसीच्या नावाने वापरकर्त्यांना संदेश पाठवतात आणि नंतर केवायसीच्या नावाने कॉल करून
वैयक्तिक माहिती घेतात आणि तुम्ही सर्व माहिती देताच तुमची फसवणूक होण्याची शक्यता वाढते.
पण एकच केवायसी आल्यास अशा फसवणुकीचा धोका राहणार नाही.
ती सामान्य लोकांना इक्विटी ट्रेडिंग आणि बँकिंग संस्थांशी झटपट जोडण्यास सक्षम करेल.
Web Title :- One Nation One KYC | one nation one kyc single window system may be released soon know benefits for you
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update