नोकरदारांसाठी मोठी बातमी ! मोदी सरकार ‘पगारा’बाबत मोठं ‘पाऊल’ उचलणार

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – केंद्र सरकार लवकरच कामगारांच्या हिताचा निर्णय घेणार आहे. यासाठी सरकार ‘वन नेशन, वन पे डे’ हि योजना लागू करण्याचा विचार सुरु असून कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. याविषयी माहिती देताना त्यांनी सांगितले कि, देशात वेतनासाठी देखील समान कायदा लागू असावा. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना एकाच दिवशी वेतन देखील मिळायला हवे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः काही दिवसांपूर्वी या योजनेबद्दल माहिती दिली होती.

या योजनेविषयी अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले कि, सरकार व्यावसायिक सुरक्षा, हेल्थ एंड वर्किंग कंडीशन कोड आणि कोड ऑन वेजेज लागू करण्याच्या दिशेने काम करत आहे.

1) या कायद्याला संसदेत मंजुरी मिळाली असून याच्या नियमांवर सध्या काम सुरु आहे.

2) सरकारने 44 नवीन कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचे काम चालू केले असून यासंबंधी तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.

3) हेल्थ अॅन्ड वर्किंग कंडीशन कोड हे बिल 23 जुलै 2019 रोजी संसदेत सादर करण्यात आले होते. या कायद्याला 13 लेबर लॉ मिळून तयार करण्यात आले होते.

4) याचबरोबर प्रत्येक कर्मचाऱ्याला अपॉइंटमेंट लेटर, वर्षाला मेडिकल उपचार आणि विविध सुविधांची देखील यामध्ये तरतूद करण्यात आली आहे.

Visit : Policenama.com