‘एक देश, एक निवडणूक’ मोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक ; काँग्रेसचा विरोध तर ममता राहणार गैरहजर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात अनेक दिवसांपासून ‘एक देश, एक निवडणूक’ हा मुद्दा चर्चेत आहे. यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. संसद भवनाच्या लायब्ररीमध्ये आज दुपारी ३ वाजता होणाऱ्या या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बसपा प्रमुख मायावती, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित राहण्यास नकार दिला आहे.

काँग्रेसचा विरोध –

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एक देश, एक निवडणूक’ याला काँग्रेसचा विरोध करणार आहे. याविषयी काँग्रेसनेत्या सोनिया गांधी यांनी १० विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा केली आहे. काँग्रेस नेत्यांची आज सकाळी या मुद्द्यावरुन बैठक होईल. त्या बैठकीत पंतप्रधानांच्या बैठकीला जायचे की नाही यावर निर्णय घेण्यात येईल. काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, ‘एक देश, एक निवडणूक शक्यही नाही आणि योग्यही नाही. काँग्रेसच्या मते, आज तुम्ही एक देश, एक निवडणूक घ्याल. तर उद्या ‘एक देश एक धर्म’ या अशी मागणी कराल.

बैठकीत उपस्थित राहण्याबाबत विरोधकांमध्ये मतभेद-

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ‘एक देश एक निवडणूक’ हा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चर्चेत आणला होता. त्यावर आता चर्चा करण्यासाठी मोदींनी बैठक बोलावली आहे. मात्र या बैठकीत उपस्थित राहण्याबाबत विरोधकांमध्ये मतभेद आहेत. बैठकीला ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू उपस्थित राहणार नाहीत मात्र काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स आहे.

एक देश, एक निवडणूक याशिवाय इतर मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. २०२२ मध्ये भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन आहे तो मोठ्या उत्साहात साजरा करण्याची मोदी सरकारची इच्छा आहे. तसेच महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी करण्याबाबतही चर्चा करण्यात येण्याची शक्यता आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

मोबाईल आणि कंप्युटरचा जास्त वापर करणाऱ्यांनी अशी घ्यावी “डोळ्याची” काळजी 

“टाच” दुखीमुळे त्रस्त असाल तर, जाणून घ्या टाच दुखीची कारणे आणि उपाय 

जाणून घ्या. कुष्ठरोगा बाबतचे समज-गैरसमज 

 “ऍसिडिटीने” त्रस्त असणाऱ्यांसाठी रामबाण उपाय