1 जूनपासून सुरू होणार ‘वन कार्ड, वन नेशन’ योजना, देशात कुठेही खरेदी करता येणार ‘रेशनिंग’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – १ जून २०२० पासून ‘एक राष्ट्र, एक रेशन कार्ड’ योजना सुरु करण्याची घोषणा केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी केली आहे. १ जानेवारीपासून ‘एक राष्ट्र, एक रेशन कार्ड’ या योजनेची सुरुवात तेलंगणा, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, मध्य प्रदेश, हरियाणा, केरळ, झारखंड, त्रिपुरा आणि गोवा या १२ राज्यांत करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत कार्डधारक आता राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत राज्यातील कोणत्याही रेशनिंगच्या दुकानात धान्य खरेदी करू शकतील. विशेष म्हणजे या योजनेत जुनं रेशन कार्ड देखील ग्राह्य धरले जाणार आहे.

देशातील एकूण १२ राज्यांमध्ये १ जानेवारीपासून ही योजना लागू 

ही योजना देशातील एकूण १२ राज्यांमध्ये १ जानेवारीपासून लागू झाली आहे. मोदी सरकारची ‘एक देश, एक रेशन कार्ड’ ही योजना अनेक महत्वाकांक्षी योजनेपैकी एक होती. या योजनेंतर्गत देशातील पीडीएस धारकांना कोणत्याही सार्वजनिक वितरण प्रणालीच्या दुकानातून आपल्या वाट्याचं रेशनिंग घेता येणार आहे. पीडीएस लाभार्थ्यांची ओळख आधार कार्डवरच्या इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल (PoS) या डिव्हाइसच्या माध्यमातून होणार आहे. राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत देशभरात ८० कोटींहून अधिक स्वस्त दरात खाद्यान्न पुरवठा केंद्र सरकारकडून करण्यात येतो.

रेशन कार्ड नंबर असणार १० अंकी

या योजनेसाठी १० अंकाचं कार्ड देण्यात आलं आहे. यामध्ये पहिल्या दोन अंकांत राज्याचा कोड असणार आहे. त्यापुढील दोन अंक रेशन कार्डच्या संख्येनुसार तर त्या पुढील अंक कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या ओळखीच्या स्वरूपात ठरवले जातील. तसेच हे रेशन कार्ड दोन भाषांमध्ये बनवता येणार आहे त्यापैकी एक स्थानिक भाषा तर दुसरी हिंदी किंवा इंग्रजी भाषा असेल.

फेसबुक पेज लाईक करा –