‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ 1 जून पासून 20 राज्यात होणार लागू, जाणून घ्या तुम्हाला कसा होईल फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील 81 कोटी लोकांना अनुदानित धान्य देणारी महत्वाकांक्षी सरकारी योजना पीडीएस (सार्वजनिक वितरण प्रणाली) साठी सोमवार, 1 जून ही तारीख खूप महत्वाची आहे. या दिवशी, देशातील 20 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ ही प्रणाली लागू केली जाईल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकतेच 20 लाख कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर करताना याचा उल्लेख केला होता. त्या म्हणाल्या की, मार्च 2021 पर्यंत ही यंत्रणा देशातील सर्व राज्यात लागू केली जाईल.

ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी ट्वीटद्वारे या संदर्भात माहिती दिली. त्यांनी ट्वीट केले कि, “देशातील कोठूनही रेशन मिळविण्यासाठी 81 कोटी एनएफएसए लाभार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून देणारी महत्वाकांक्षी योजना # ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ मोदी 2.0 सरकारची महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. 1 जून पर्यंत 20 राज्ये यात सामील होतील आणि मार्च 2021 पर्यंत ती देशभरात राबविली जातील. यापूर्वी 1 जानेवारी रोजी ही प्रणाली देशातील 12 राज्यात सुरू झाली होती. केंद्रीय मंत्री पासवान यांनी याबाबत माहिती दिली होती.

स्वस्त दरात उपलब्ध होईल धान्य
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 नुसार सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत देशातील 81 कोटी लोक, वाजवी किंमतीच्या दुकानातून तांदूळ तीन रुपये प्रतिकिलो दराने गहू आणि दोन रुपये प्रतिकिलो दराने गहू आणि एक किलो प्रतिकिलो दराने धान्य विकत घेऊ शकता.

या योजनेचा कोणाला होईल फायदा
कोरोना संकटाच्या या काळात ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ ही योजना खूप महत्वाची ठरणार आहे. यासह देशातील परप्रांतीय कामगारांना अन्य राज्यांत कमी दराने धान्य मिळणार आहे. केंद्र सरकारच्या या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत पीडीएस लाभार्थ्यांची ओळख पटविली जाईल. लाभार्थ्यांना आधार कार्डवरील इलेक्ट्रिक पॉईंट ऑफ सेल (पॉस) वरून या योजनेचा लाभ मिळणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like