1 जून 2020 पासून देशात कुठेही घ्या ‘रेशन’, ‘वन नेशन – वन रेशन कार्ड’ची महाराष्ट्रात ‘प्रायोगिक’ तत्वावर सुरूवात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी शुक्रवारी वन नेशन, वन रेशन कार्ड या प्रकल्पाची विधिवत ऑनलाइन उद्घाटन केले आहे. ही योजना आता महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, आंध्रप्रदेश् या राज्यात प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आली आहे. या अंतर्गत आता राज्यातील कोणताही रेशन कार्डधारक राज्यातील कोणत्याही दुकानातून रेशनवरील धान्य खरेदी करु शकतो.

या संबंधित बोलताना केंद्रीय मंत्री रामविलास पासवान म्हणाले की, वन नेशल, वन रेशन कार्ड योजना १ जून २०२० पासून संपूर्ण देशात लागू होईल. ते म्हणाले की योजना पूर्णता अमलात आल्यानंतर रेशन कार्डधारक देशाच्या कोणत्याही राज्यातून कोणत्याही पीडीएस दुकानातून रेशन खरेदी करु शकतात. या योजनेचा सर्वात जास्त फायदा त्या लोकांना मिळेल, जे नोकरीनिमित्त दुसऱ्या राज्यात राहतात. अशात आता स्थानिक स्तरावर पुन्हा रेशन कार्ड काढण्याची आवश्यकता नाही.

केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा या राज्यात ही योजना लागू झाली, या दरम्यान महाराष्ट्रातील लाभार्थी गुजरातच्या रेशन दुकानातून आणि गुजरातमधील लाभार्थी महाराष्ट्रातील दुकानातून कोणत्याही अडचणी शिवाय धान्य खरेदी करु शकतात. यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून लाभार्थ्यांशी संवाद साधला.

याशिवाय पीडीएसच्या दुकानांमध्ये आता पीओएस लावण्यात येईल. जेणे करुन डिजिटल बँकिंगला प्रोस्ताहन मिळेल.