खुशखबर ! 15 जानेवारीपासून मोदी सरकार महाराष्ट्रासह ‘या’ 12 राज्यात लागू करणार ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कामाच्या शोधात दुसऱ्या राज्यांमध्ये जाणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. येणाऱ्या 15 जानेवारीपासून देशात ‘एक राष्ट्र, एक रेशन कार्ड’ लागू होणार आहे. लाभार्थी देशामध्ये कुठेही ई-पीओएस उपकरणावर बायोमेट्रिक केल्यानंतर आपल्या रेशन कार्डचा उपयोग करून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत अन्न सुरक्षेबाबतचा लाभ घेऊ शकणार आहेत.

लाभार्थी कोणताही अतिरिक्त खर्च किंवा कागदपत्रांशिवाय लाभ मिळवू शकणार आहे आणि त्यांना आपल्या गृह, राज्य किंवा केंद्र शासित प्रदेशात देण्यात आलेले विद्यमान रेशनकार्ड परत करण्याची आणि स्थलांतरणाच्या स्थितीत नवीन रेशनकार्डसाठी अर्ज करण्याची गरज नाही.

देशात एकूण 79 कोटी लोकांकडे रेशन कार्ड आहे. त्यामुळे बारा राज्यांमधील 35 कोटी लोकांना याचा फायदा होणार आहे. जून 2020 मध्ये एकूण 20 राज्यांमध्ये लागू करण्यात येणार आहे.

या योजनेमुळे एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये कामासाठी जाणाऱ्या कमी उत्पन्न असलेल्या लोकांना सगळ्यात जास्त फायदा होणार आहे. हे आधार लिंक कार्ड आहे. इ पॉईंट ऑफ सेलच्या माध्यमातून ‘एक राष्ट्र, एक रेशन कार्ड’ला शक्य बनवण्यासाठी 880 कोटी रुपये कंप्यूटराइजेशनवर खर्च होत आहे.

‘एक राष्ट्र, एक रेशन कार्ड’ सुरुवातीला 12 राज्यांमध्ये लागू होणार आहे.

पुढील राज्यातील कार्ड होल्डर कोणत्याही राज्यातून आपले रेशन घेऊ शकणार आहेत.

1) आंध्रप्रदेश, 2) तेलंगना, 3) गुजरात, 4) महाराष्ट्र, 5) हरियाणा, 6) राजस्थान, 7) कर्नाटक, 8) केरळ, 9) गोवा, 10) मध्यप्रदेश, 11) त्रिपुरा, 12)झारखंड.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/